अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे, ता. २० - पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी (ता. 20) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेतली.

दोन दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागांनाही फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने काम करावे, असे त्यांनी जिल्हाधिका-यांना निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories