पोलिस आयुक्तांनी शहरातील १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द तसेच ६८ व्यक्तींना नाकारले शस्त्र परवाने

पोलिस आयुक्तांनी शहरातील १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द तसेच ६८ व्यक्तींना नाकारले शस्त्र परवाने

पोलिस आयुक्तांनी शहरातील १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द तसेच ६८ व्यक्तींना नाकारले शस्त्र परवाने 

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकताच शस्त्र परवाना प्रकरणांचा आढावा घेतला. यामध्ये, १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत आणि एकूण ६८ नवीन शस्त्र परवाना मागणी करणाऱ्या व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहे.

शस्त्र परवानाधारक १) मयुर काळुराम भोईर (वय-३० वर्षे, रा. हिंजवडी), २) सुभाष भिकाजी सपकाळ (वय-७० वर्षे, रा.नवी सांगवी), ३) विजय नामदेव लांडे (वय-४८ वर्षे, रा. भोसरी), ४) साहिल राजेंद्र ढमाले (वय ३२ वर्षे, रा. देहुगाव), ५) शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय-४१ वर्षे, रा.आंबेठाण) यांचे विरुद्ध शस्त्राचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने  त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी प्राथमिक चौकशी आदेशित केली. चौकशीअंती वरील  ५ परवानाधारकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना मंजुर केलेल्या व्यक्ती, ज्यांनी विहित मुदतीत शस्त्र खरेदी केले नाहीत, अशा २ शस्त्र परवानाधारकांचे  शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना वृध्दत्व आले किंवा मरण पावले, अशा एकूण ८ परवानाधारकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. या प्रमाणे एकूण १५ शस्त्र परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 

याशिवाय, नवीन शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे प्राप्त अर्जापैकी एकूण ६८ व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहेत. सदर प्रकरणांच्या प्राथमिक चौकशीमध्ये नमुद व्यक्तींना शस्त्र परवाने मंजुर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण / आधार नसल्याचे आढळून आल्याने, त्यांना शस्त्र परवाने नाकारण्यात आलेले आहेत.

भविष्यात देखील शस्त्र परवान्यासंबंधात अशाच प्रकारे कडक धोरण अवलंबिले जाणार आहे, पिंपरी-चिंचडचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories