अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती, तक्रार किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ 'Anti Narcotics Helpline'ला कळवा, पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती, तक्रार किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ 'Anti Narcotics Helpline'ला कळवा, पोलिसांचे आवाहन
'अंमलीपदार्थ मुक्त पिंपरी चिंचवड' मोहिमेबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा नागरिकांशी 'X' (TWITTER)द्वारे जागृतीपर संवाद
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - अंमली पदार्थमुक्त पिंपरी-चिंचवड या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मंगळवारी (ता. २८) 'X' (TWITTER) माध्यमातून 'Virtual Town Hall'या अभिनव संकल्पनेद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला.
सदर उपक्रमामध्ये पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा/कॉलेज/औदयोगिक समूह, हौसिंग सोसायटी, डॉक्टर्स असोशिएसन, मेडिकल असोशिएसन, हॉटेल समुह, एनजीओ, सार्वजनिक मंडळाचे असे एकूण ८१९ समूहातील विदयार्थी, नागरिक, कंपनीतील कर्मचारी असे विविध क्षेत्रातील ४५,०००/- लोकांनी सहभाग घेतला. पोलिस आयुक्त चौबे यांनी सहभागी विद्यार्थी-नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करुन जनजागृती केली.
'X' (TWITTER) माध्यमातून 'Virtual Town Hall' या अधिकृत हँडल्सवर आपले प्रश्न, सूचना, तक्रारी मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानुसार नागरिकांनी विविध प्रकारच्या अंमली पदार्थांचे दृष्परिणाम व अंमली पदार्थ मिळून आल्यास काय करावे ? या विषयी तसेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांना चौबे यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी Anti Narcotics Helpline Number 7798100112 सुरु करण्यात आला असून सदर क्रमांकावर कॉल करुन अंमली पदार्थ विषयक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस उप-आयुक्त, सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवा
"अंमली पदार्थांविरोधात आम्ही पूर्ण क्षमतेने काम करत असून आम्हाला या अंमली पदार्थ विरोधी लढाईत आपले सहकार्य व सक्रिय सहभाग आवश्यक आहे. संशयास्पद हालचालींची माहिती निःसंकोचपणे पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. जनजागृती, समुपदेशन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच आपण आपल्या तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचवू शकतो. चला, सर्वांनी मिळून अंमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि सशक्त पिंपरी-चिंचवड घडविण्याचा संकल्प करूया. अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती, तक्रार किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ आमच्या Anti Narcotics Helpline वरती संपर्क साधावा. 📞 Anti Narcotics Helpline: 7798100112 माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.''
— विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड