हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ग्राहक गंभीर जखमी, पिंपरीतील घटना
May 05 2026
24
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ग्राहक गंभीर जखमी, पिंपरीतील घटना
पिंपरी, ता. ५ - मध्यरात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाला हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीच किरकोळ कारणावरुन मारहण करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (ता. ४) मध्यरात्री २ च्या सुमारास साई चौक - पिंपरी येथील हॉटेल रौनकमध्ये घडली. मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, मारहाण झालेले आशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३० वर्षे, खाजगी नोकरी, रा. नेहरुनगर) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी १) अब्बास असादुन शेख (वय ३० वर्षे, नोकरी, रा. पिंपरी), मोहंमद अजिज आशान शेख (वय २१ वर्षे, रा. पिंपरी) व ३) पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३० वर्षे, रा. बौध्दनगर, पिंपरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी आशिष व त्याचा मित्र मनोज पुंड हे हॉटेल रौनकमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा आशिषने जेवणाची ऑर्डर केली. त्यावर, वेटर अजीज याने ओरडून हॉटेल बंद झाले आहे असे सांगितले. त्यामुळे, आशिषने त्याला नीट बोलण्यास सांगितले असता तिन्ही आरोपींनी हॉटेलबाहेर आशिषला स्वयंपाक करण्याच्या झा-याने व इतर वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहणाऱ्या लोकांनाही आरोपीने ''कोणी मध्ये आले तर त्याला सोडणार नाही.'', अशी दमदाटी केली. हा प्रकार पाहून रस्त्यावर थांबलेले लोक घाबरुन सैरावरा पळून गेले.
आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ११५ (२), ३ (५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट, कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
- जेवण ऑर्डर वाद, Food Order Dispute, हॉटेल वाद, Hotel Dispute, नेहरू नगर, Nehru Nagar, बौध्दनगर, Buddha Nagar,
- पिंपरी घटना, Pimpri Incident, कर्मचाऱ्यांची मारहाण, Staff Assault, किरकोळ कारण, Minor Reason,
- हॉटेल रौनक, Hotel Raunak, साई चौक, Sai Chowk,
- ग्राहक, Customer, गंभीर जखमी, Seriously Injured,
- पिंपरी, Pimpri, हॉटेल मारहाण, Hotel Assault,