सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १० - वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने भर रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला मंगळवारी (ता. ९) पिंपरी चौकाडून शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिटी प्लाझा लॉज समोर आढळली.
ती महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारत होती, डोळयाने खुणावत होती व हाताने लैगिंक हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी येणाजाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. तिच्या या गैरवर्तनामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होत होता.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन आरोपी महिलेवर पिंपरी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.