पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या....'पीएमपी'च्या बसने

पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या....'पीएमपी'च्या बसने

पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या....'पीएमपी'च्या बसने 

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - पावसाळी पर्यटनासाठी  पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) प्रेक्षणीय स्थळांसाठी नव्याने पर्यटन बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेतून नागरिकांना टाटा मुळशी धरण, पळसे धबधबा, मुळशी शिवालय मंदिर अशा निसर्गरम्य, मनोहारी ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. 

पीएमपीएमएल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार 'मार्ग क्रमांक ९ अ' ही पर्यटन बससेवा २९ जुलैपासून सुरु करण्यात आली आहे. 

यामध्ये, पर्यटनसेवेसाठी सध्या लागू असलेल्या फक्त ५०० रूपयांच्या तिकीटामध्येच पर्यटन स्थळांची सफर करता येणार आहे.

पावसाळी पर्यटन बससेवा 'मार्ग क्रमांक ९-अ'  ही बससेवा प्रवाशांच्या बुकिंग नुसार उपलब्ध असणार आहे. ही बस स्वारगेट येथून सकाळी ८ वाजता सुटेल आणि पर्यटन करुन परत सायंकाळी ७.३० वाजता स्वारगेटला पोहचेल. 'पीएमपीएमएल'च्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता येईल.

'पीएमपीएमएल'च्या या किफायतशीर तसेच निसर्गसौंदर्य व प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories