पवना धरण 97% भरले, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पवना धरण 97% भरले, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - सद्यस्थितीमध्ये पवना धरण 97% भरलेले आहे. पवना नदीपात्रामध्ये 3620 क्युसेक विसर्ग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.
पवना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन एकूण विसर्ग 5000 क्युसेक करण्यात येणार आहे.
पावसाचे प्रमाण व येवा पाहता हा विसर्ग 12000 क्युसेक पर्यंत टप्पा टप्प्याने वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतची आवश्यक माहिती विसर्गावेळी जलसंपदा विभागामार्फत देण्यात येईल.
सततच्या होणाऱ्या पावसामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. नदीच्या सखल भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदीपात्रातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील आपले साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तथा जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हलवण्यात यावीत. कोणत्याही प्रकाराच्या अफवांना बळी न पडता, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व तालुका/ जिल्हा/ शहर प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे, असे पवना धरण प्रकल्प व्यवस्थापनाने कळवले आहे.
याशिवाय, मुळशी व वडिवळे धरणातून मुळा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदीकाठ व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नदीकाठच्या परिसरात जाऊ नये, नदी नाल्यांच्या प्रवाहात उतरू नये आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

- Pune Rain, Pune Weather Alert, पुणे जिल्हा पाऊस, Pune District Rain, जलसंपदा विभाग, Water Resources Department
- Pavana River Alert, पूर परिस्थिती, Flood Situation, Flood Alert, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, Citizen Alert, Monsoon Alert, Maharashtra Monsoon, Heavy Rainfall, मुसळधार पाऊस, Rain Update
- Water Level Alert, पाण्याचा विसर्ग, Water Discharge, नदीपात्रातील पाणी, River Water Level, पवना नदी, Pavana River
- पवना धरण, Pavana Dam, Pavna Dam, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, PCMC, धरण 97 टक्के भरले, Dam 97% Full