लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टला पुण्यात 'पीएमपीएमएल'च्या काही बसमार्गांमध्ये बदल
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टला पुण्यात 'पीएमपीएमएल'च्या काही बसमार्गांमध्ये बदल
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सारसबाग चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची लक्षणीय संख्या विचारात घेता 'पीएमपीएमएल'च्या काही बस मार्गांमध्ये दुपारनंतर बदल होण्याची शक्यता आहे.
सदर बाब विचारात घेता दिनांक १ ऑगस्टला, येत्या रविवारी बस मार्ग क्र. २, २अ, २व, ३, ४, ११, ११, ११क, १२, १३, १५, १५अ, १७, २१, २६, ३०, ३७, ३८,४१,४२, ४७,५०,५२, ५२, ६०,६४, ६४अ, ६४म, ६६, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७८,९०, ९७, १०१, १०३, १११,१११म, ११७, ११८, ११८, १९९, २१६, २२७, २२७अ, २३१, २३२, २३३, २३३अ, २३३ब, २७९, २९७, २९८, २९९, ३३९ व ३५४ या मार्गांच्या बसेसच्या मार्गात बदल केला जाईल.
हा बदल म्हणजे, जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी रस्ता बंद झाल्यास सदरची वाहतूक दुपारपाळी मध्ये लक्ष्मी नारायण टॉकीज कडून डाव्या बाजूस वळवून मित्र मंडळ चौक, सारसबाग मार्गे संचलनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यास सदर बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटतील व रस्ता सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बसस्थानकाहून बसेस सुटतील.
या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन, 'पीएमपीएमएल'कडून करण्यात येत आहे.