स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट कनेक्टिव्हिटी, पुणे मेट्रो टप्पा-२ ठरणार शहराच्या प्रगतीचा नवा मार्ग....

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट कनेक्टिव्हिटी, पुणे मेट्रो टप्पा-२ ठरणार शहराच्या प्रगतीचा नवा मार्ग....

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट कनेक्टिव्हिटी, पुणे मेट्रो टप्पा-२ ठरणार शहराच्या प्रगतीचा नवा मार्ग....

पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ -   पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती शक्ती – वाकड – नाशिक फाटा – चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR)सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा व्यापक आराखडा साकार होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेसमोर सदर डीपीआर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. 

यावेळी महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते  प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त  तृप्ती सांडभोर, यांच्यासह महामेट्रो आणि महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


📍 प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

▪️ एकूण प्रकल्प किंमत – ₹१२,९३७.२३ कोटी

▪️ मेट्रो मार्गिकेची लांबी – ४५.२९५ कि.मी.

▪️ एकूण मेट्रो स्थानके – ३४


🔗 चार महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांशी एकात्मिक जोडणी :

✅ भक्ती शक्ती (फेज-१ विस्तार)

✅ वाकड चौक (पुणे मेट्रो लाईन-३)

✅ नाशिक फाटा (लाईन-१)

✅ संत तुकाराम नगर (लाईन-१)


भविष्यातील पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वाच्या सूचना...

🚆 निगडी-तळवडे आयटी पार्क-चाकण 'मिसिंग लिंक' मेट्रो कॉरिडॉर विकसित करून पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि चाकणला जोडणारे 'रिंग मेट्रो नेटवर्क' निर्माण करण्याचा प्रस्ताव.

🏗️ तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर 'इंटिग्रेटेड डबल डेकर कॉरिडॉर' उभारून भविष्यातील मेट्रो विस्ताराचा मार्ग अधिक सुकर करण्याची सूचना.

🌐 भक्ती-शक्ती चौक, भुजबळ चौक, वल्लभनगर आणि मोशी येथे जागतिक दर्जाचे 'मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब्स' विकसित करून मेट्रो, बीआरटी, पीएमपीएमएल, एसटी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव.

शहर मेट्रोच्या जाळ्याने जोडण्याचा संकल्प....

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा विचार करून सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. शहरातील प्रत्येक भाग मेट्रोच्या जाळ्याने जोडण्याचा आमचा संकल्प आहे. निगडी-चाकण, निगडी-वाघोली आणि रिंग मेट्रोच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला देशातील सर्वोत्तम मेट्रो कनेक्टिव्हिटी असलेले शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." - आमदार महेश लांडगे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories