'पवना धरण भरले, पाणी कपात तत्काळ रद्द करा', नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
'पवना धरण भरले, पाणी कपात तत्काळ रद्द करा', नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात सुरू असलेली पाणी कपात तत्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना केली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे पिंपरी-चिंचवड यांनी महापालिका आयुक्तांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरात सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांवर, ज्येष्ठ नागरिकांवर ताण निर्माण झाला आहे.
घरगुती वापर, स्वच्छता, आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था, लघुउद्योग आणि व्यापारी आस्थापनांवरही या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणी कपात तत्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, असे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.