पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा १० जूनपासून सुरु
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा १० जूनपासून सुरु
पुणे, ता. ९ - पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे 'पुणे दर्शन' बससेवेच्या धर्तीवर 'पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन' बससेवा सुरु १० जूनपासून सुरु करण्यात येत आहे. वेगाने विस्तारणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर पर्यटकांना घडविण्यासाठी ही स्पेशल सेवा सुरु केली जात आहे. या एक दिवसीय बससेवेचे तिकीट फक्त ५०० रुपये इतके असणार आहे. नव्याने सुरु केलेल्या 'पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन' बससेवेचा लाभ घेऊन पर्यटकांनी आनंदाने पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे 'पीएमपी'ने आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवड दर्शन बस पुणे स्टेशन डेपोतून सकाळी ७.४५ वाजता आणि डेक्कन जिमखानी बस स्थानकातून सकाळी ८ वाजता सुटणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सायन्स पार्क चिंचवड, चाफेकर बंधू स्मारक (वाह्य दर्शन), श्री मोरया गोसावी मंदिर चिंचवड आणि पुण्यातील चतुःशृंगी माता मंदिर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, सारसबाग गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर (बाह्य दर्शन), पु.ल.देशपांडे उद्यान ही प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना दाखवली जाणार आहेत. सफर पूर्ण झाल्यानंतर ही बस साधारण सायंकाळी ६.३० च्या सुमारास पर्यटकांना पुन्हा मूळ (बस सुटण्याच्या ठिकाणी) ठिकाणी सोडणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरु केली जात आहे. याआधी पुणे दर्शन बससेवाही पीएमपीएमएलकडून सुरु आहे. यामध्ये केसरीवाडा, शनिवारवाडा, लालमहाल, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, महात्मा फुले वाडा, आगाखान पॅलेस, आदिवासी वस्तू संग्रहालय, युध्द भूमी/नॅशनल वॉर मेमोरियल, सदन कमांड एरिया, शिंदे छत्री, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, सारसबाग गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर (बाह्य दर्शन), पु.ल.देशपांडे उद्यान, कळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, चतुःशृंगी माता मंदिर,एविएशन गॅलरी शिवाजीनगर या ठिकाणांची सफर पर्यटकांना घडवली जाते.