शिवशाही शासन पक्षाच्या तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी समीरा सुनील राजगुरू यांची नियुक्ती

शिवशाही शासन पक्षाच्या तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी समीरा सुनील राजगुरू यांची नियुक्ती

शिवशाही शासन पक्षाच्या तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी समीरा सुनील राजगुरू यांची नियुक्ती 

पिंपरी, ता. १० - शिवशाही शासन पक्षाच्या  तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी समीरा सुनील राजगुरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी समाजाला सन्मान, रोजगार, आरोग्य, शिक्षण सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देणे या मुख्य उद्देशाने समीरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे "जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य अपूर्ण आहे." त्याच विचाराने शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडी बहुजन-तृतीयपंथी एकतेचा नवा अध्याय लिहिणार आहे. समीरा राजगुरु या समाजासाठी झटणाऱ्या, निर्भीड आणि स्पष्टवक्त्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या  नेतृत्वाखाली शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडी राज्यभरातील तृतीयपंथी भगिनींच्या समस्या शासन दरबारी मांडेल आणि 'घर-रेशन-ओळखपत्र-आरोग्य' या मूलभूत हक्कांसाठी लढा देईल.'', असे पक्षाचे प्रमुख युवराज दाखले यांनी सांगितले. 

यावेळी शिवशाही शासन पक्ष प्रदेश प्रमुख कृष्णा साबळे, उपप्रमुख मंगेश डाखोरे, सोशल मिडिया प्रमुख आकाश घोलप, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख शिवाजी खडसे,शिवशाही महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अनिता वैरागळ,शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडी प्रदेश अध्यक्षा अर्चना शिंदे, क्रांतिवीर बापुबिरू वाटेगावकर धनंगर समाजाचे नेते सोमनाथ काळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories