news
clock
पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचे 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एक महिन्याच्या आत निविदा - डॉ. सुरेश गोसावी

पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचे 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एक महिन्याच्या आत निविदा - डॉ. सुरेश गोसावी

पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचे 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एक महिन्याच्या आत निविदा - डॉ. सुरेश गोसावी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचे 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एक महिन्याच्या आत निविदा - डॉ. सुरेश गोसावीपुणे विद्यापीठाच्या वार्षिक सभेत अधिसभा सदस्यांची मागणी

पुणे, ता. २७ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वार्षिक सभेला आज, शुक्रवारी (ता. २७) सुरुवात झाली. सन २०१७ ते २०२४ दरम्यान झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे 'फॉरेन्सिक ऑडिट' करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी केली. त्यावर, विद्यापीठाच्या कामकाजाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी एका महिन्याच्या आत निविदा काढण्यात येईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.

पुणे विद्यापीठाची या आधिची अधिसभा ३० सप्टेंबर २०२५ ला झाली. त्या सभेत विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यावेळी विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येईल आणि त्याचा अहवाल ३१ मार्च २०२६ पर्यंत सादर करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरु डॉ. गोसावी यांनी दिले होते. पण, मार्च महिना संपत आला तरी अहवाल सादर झाला नाही आणि  विद्यापीठाने फॉरेन्सिक ऑडिट करायचे की नाही हे ठरविण्यासाठी फेब्रुवारीला परस्पर समिती नेमल्याची माहिती सभेसमोर आली, त्यामुळे म्हणून अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

दिनांक १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२४ या काळातील विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांचे हिशेब बेकायदेशीर आणि शंकास्पद आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे  'फॉरेन्सिक ऑडिट' करावे. विद्यापीठातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांन केली होती.

पुणे विद्यापीठाच्या २०१७ ते २०२४ या कालावधीतील कामकाजाचे फॉरेन्सिक ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी एका महिन्याच्या आत निविदा प्रसिद्ध करण्यात येईल आणि ही कार्यवाही लवकर करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येईल, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories