पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प शुक्रवारी अधिसभेत सादर होणार

पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प शुक्रवारी अधिसभेत सादर होणार

पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प शुक्रवारी अधिसभेत सादर होणार 

पुणे, ता. २४ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची सन २०२६ मधील वार्षिक सभा येत्या शुक्रवारी (ता. २७) होणार आहे. यावेळी विद्यापीठाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प  आणि सन २०२५-२६ मध्ये कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी मान्यता दिलेले प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केले जाणार आहेत.

विद्यापीठाचा अर्थसंकल्प मांडताना तो निधीवर आधारित मांडावा, अशी मागणी अधिसभेचे सदस्य विनायक आंबेकर यांनी २२ मार्च २०२५ रोजी झालेल्या अधिसभेत केली होती. त्यानुसार २०२६-२७ या वर्षीचा अर्थसंकल्प निधीवर आधारित मांडला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम १३४ प्रमाणे सर्वसाधारण (जनरल) निधी, वेतन निधी आणि ट्रस्ट निधी या तिन्ही निधींमधील जादाची रक्कम विद्यापीठ कायम विकास आणि कार्यक्रम निधीला वर्ग करणार आहे.  विद्यार्थी आणि सेवक कल्याण कार्यक्रम निधीचा आधार घेत यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. त्यामुळे, यंदा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातील तूट तुलनेने कमी दिसत आहे, असे विनायक आंबेकर, यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थी अर्थसाहाय्य योजनांसाठी भरीव तरतूद, गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत आर्थिक तरतुदीत तसेच स्टार्टअप संबंधित उपक्रमांसाठी तरतुदीत वाढ,  कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेंतर्गत दरवर्षीप्रमाणे तरतूद असणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories