माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
पिंपरी, ता. ४ - नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित 'पिंपरी करंडक - २०२६' भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे उत्साहात पार पडला. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा पार पडली. स्पर्धेत विविध गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या खेळातील गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली. चाळीस वर्षावरील गटाच्या सहभागामुळे ज्येष्ठ खेळाडूंनाही आपली क्रीडा आवड जोपासण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळाली, स्थानिक खेळाडूंना क्रिडाक्षेत्रात करिअर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीकांनी व खेळाडूंनी दिली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सीमा साळवे, सारंग कामथेकर, निकिता कदम, प्रियांका कुदळे, गिरिजादेवी कुदळे, ज्ञानोबा गव्हाणे, सुरेश शिंदे, वस्ताद दत्तोबा नाणेकर, शेखर अहिरराव, शांती सेन, मीनाताई नाणेकर, किसन कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, हरिष वाघेरे, राघवेंद्र भांडगे, गणेश मंजाळ आणि सारथी काळे यांनी केले.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, “ आपल्या परिसरातील युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. स्व. अजित दादा पवार यांच्या स्मृतीही या स्पर्धेतून जपल्या जातील. क्रीडा क्षेत्रातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. या स्पर्धेमुळे अनेक नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
१) पिंपरीगाव संघटना गट
उत्कृष्ट फलंदाज : मनीष कटारिया
उत्कृष्ट गोलंदाज : कुणाल गोडेला
मालिकावीर : ओम सुर्वे
प्रथम क्रमांक : ACC संघ
द्वितीय क्रमांक : स्वराज्य क्रिकेट क्लब
तृतीय क्रमांक : फ्युरियस क्रिकेट क्लब
चतुर्थ क्रमांक : पिंपरी 11
२) 40+ गट
उत्कृष्ट फलंदाज : गणेश जाधव
उत्कृष्ट गोलंदाज : चेतन सुतार
मालिकावीर : अमोल माने
प्रथम क्रमांक : संविधान ग्रुप
द्वितीय क्रमांक : SNV A
तृतीय क्रमांक : SNV B
चतुर्थ क्रमांक : सचिन भाऊ गवळी
३) खुला गट
उत्कृष्ट फलंदाज : निलेश
उत्कृष्ट गोलंदाज : शिवम
मालिकावीर : विशाल
प्रथम क्रमांक : निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन
द्वितीय क्रमांक : गावदेवी गावठाण, उरण
तृतीय क्रमांक : नामदेव ढाके स्पोर्ट्स फाउंडेशन
चतुर्थ क्रमांक : क्रांतिवीर क्रिकेट क्लब, नवलाख उंबरे