पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर स्थानिक व कार्यक्षम अभियंत्याची नियुक्ती करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर स्थानिक व कार्यक्षम अभियंत्याची नियुक्ती करण्याची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची मागणी, महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता हे महत्त्वाचे पद गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त आहे. आपण आयुक्तपदी रुजू होऊन दोन महिने पूर्ण झाले असले तरी अद्याप शहराला कायमस्वरुपी शहर अभियंता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विकासकामांवर तसेच प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे, त्यामुळे त्वरित शहरअभियंता पदी नियुक्ती करावी,अशी मागणी पिंपरीतील माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील शैक्षणिक अर्हता असलेले अनुभवी, कार्यक्षम स्थानिक अभियंत्यांची शहर अभियंता पदावर त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे, शहरातील आमदार, खासदार, माजी पदाधिकारी किंवा इतर राजकीय हस्तक्षेपामुळे हे पद आतापर्यंत रिक्त राहिले असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये आहे.
त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता, आवश्यक शैक्षणिक अर्हता व प्रशासकीय अनुभव असलेल्या स्थानिक अभियंत्यांची शहर अभियंता पदावर तातडीने नियुक्ती करण्यात यावी.
- माहिती अधिकार कार्यकर्ते, RTI activists, रमेश वाघेरे, Ramesh Waghere, महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, Municipal Commissioner Dr. Vijay Suryawanshi
- विकासकाम, development works, प्रशासकीय कामकाज, administrative work,
- नियुक्ती मागणी, appointment demand, स्थानिक अभियंता, local engineer, कार्यक्षम अभियंता, competent engineer,
- Pimpri-Chinchwad Municipal Corporation, शहर अभियंता, City Engineer,