वाकडमध्ये गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या युवतीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १७ - बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याकडून ८७००/- रुपयांचा १६४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे १६ जूनला करण्यात आली.
याबाबत फिर्याद पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी दिली आहे. आरोपी युवतीस अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी आरोपी युवतीवर वाकड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.