news
clock
मोशी-चिखली परिसरातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी जलकुंभ उभारण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची महापौरांशी चर्चा

मोशी-चिखली परिसरातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी जलकुंभ उभारण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची महापौरांशी चर्चा

मोशी-चिखली परिसरातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी जलकुंभ उभारण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची महापौरांशी चर्चा 

पिंपरी, ता. ३० -   मोशी–चिखली परिसरातील नागरीक पाणी टंचाईने वैतागले आहेत. या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने दूषित पाणीपुरवठा होत आहे.  हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने पुढाकार घेऊन महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली. पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी चिखली येथील श्रीराम चौक परिसरात जलकुंभ उभारावा अशी मागणी महापौरांकडे केली. या मागणीला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने या कामासाठी विलंब केल्यास मोठे जनआंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

 मोशी–चिखली परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होतोय आणि बऱ्याचदा पाणी दूषित असल्याचे दिसते. परिणामी, टँकर बोलावण्याची वेळ येते आणि  नागरिकांना विनाकारण  आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे असेच सुरु राहिले तर या परिसरात टॅंकरमाफियांचा सुळसुळाट होईल. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी   पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने पावले उचलली.

महापौरांसह, महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.  पाणीपुरवठा विभागाच्याअधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जलकुंभ उभारण्यासाठी जागेची पाहणी करून तातडीने अभियंते पाठवून तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येईल. जागा व प्रकल्प व्यवहार्य ठरल्यास या कायमस्वरूपी उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी निश्चित नियोजन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे. संघटनेचे पदाधिकारी आमदार महेशदादा लांडगे यांची भेट घेऊन या प्रकल्पाला राजकीय व प्रशासकीय मान्यता मिळावी, तसेच आगामी महानगरपालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, यासाठी सविस्तर चर्चा करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संघटनेने सातत्याने लावून धरला आहे. महापालिका विधी समितीच्या सभापती सुजाता निलेश बोऱ्हाडे, नगरसेवक राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, सारिका बोऱ्हाडे यांनीही या विषयात लक्ष घालून पाठपुरावा सुरु केल्याचे सांगितले आहे. 

महापौरांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी, सचिव प्रकाश जुकंटवार, वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश उडाणे, वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज सिंग, खजिनदार योगेश चौधरी, कमिटी सदस्य देवाशीष प्रधान, विजय पाणी, अविनाश खैरनार, प्रणव खैरनार उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories