news
clock
सिगारेटचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला पेट्रोल फेकून  जाळण्याचा प्रयत्न, तळवडेतील घटना

सिगारेटचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न, तळवडेतील घटना

सिगारेटचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला पेट्रोल फेकून  जाळण्याचा प्रयत्न, तळवडेतील घटना

पिंपरी, ता. 29 - टपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याला पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना गणेशनगर -‌ तळवडे येथील रत्न पान शॉपवर सोमवारी (ता. २७) रात्री दहा वाजता घडली.

याप्रकरणी, टपरीचालक वैभव तांबारे (वय 25 वर्षे, राहणार मोशी) याने तक्रार दिली आहे. आरोपी सचिन सुनील पुनासे (वय 25 वर्षे, राहणार चाकण) व भूषण संजय सुरडकर (वय 25 वर्षे राहणार निघोजे, तालुका खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी मूळचे मध्य प्रदेशातील आहेत.

सोमवारी आरोपी हे फिर्यादी वैभवच्या पान टपरीवर गेले होते. त्यांनी सिगारेट घेतली. टपरीचालक वैभवने आरोपींना सिगारेटचे पैसे मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला व वैभवसोबत वाद घातला.‌ " तुला जिवंत सोडणार नाही",  अशी धमकी देऊन ते मोटरसायकलवरुन तिथून निघून गेले. मात्र नंतर पुन्हा दहा वाजता ते टपरीजवळ आले आणि सोबत प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पेट्रोल त्यांनी वैभवच्या अंगावर फेकले व माचिसची पेटलेली काडी देखील वैभवच्या अंगावर फेकली आणि त्याला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून वैभव बचावला आहे.

 दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. २८) चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories