चिखली-कुदळवाडी परिसरात बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई,
Apr 25 2026
42
बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई, चिखली-कुदळवाडी परिसरात विशेष तपासणी मोहिम
पिंपरी, ता. २५ - चिखली-कुदळवाडी परिसरात बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विशेष मोहिम राबवून ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत प्लास्टिक पिशव्या व बंदी घातलेल्या साहित्याचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधितांना स्वच्छता व पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदर कारवाई फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटिल, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचन कुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक रामचंद्र शिंगाडे, ग्रीन मार्शल रवि हाटकर, सुरक्षा रक्षक सुमित यादव आणि जणवाणी गट यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये सुधीर वागले यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत कारवाईची अंमलबजावणी केली.
महापालिकेच्या पथकाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा व प्लास्टिकविरोधी कारवाया पुढील काळातही सातत्याने राबवण्यात येणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.