news
clock
बिल मागितल्याच्या कारणावरुन ग्राहकाची दुकानदाराला मारहाण, डोक्यात मारला लाकडी ठोकळा

बिल मागितल्याच्या कारणावरुन ग्राहकाची दुकानदाराला मारहाण, डोक्यात मारला लाकडी ठोकळा

बिल मागितल्याच्या कारणावरुन ग्राहकाची दुकानदाराला मारहाण, डोक्यात मारला लाकडी ठोकळा 

पिंपरी, ता. २५  - चहा-नाश्त्याच्या टपरीवर बिल मागितल्याच्या कारणावरुन ग्राहकाने कांदा कापण्याचा लाकडी ठोकळा आचाऱ्याच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (ता. २४) सकाळी ५ च्या सुमारास घडला ताथवडे परिसरात घडला. आरोपी युवकावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, मारहाण झालेला अनिल काशीनाथ काळगे (वय २५, रा. गजानननगर, रहाटणी) याने तक्रार दिली आहे. अनिल हा त्याचे सहकारी भीमबहादुर मगर यांच्यासोबत चहा-नाश्त्त्याच्या दुकानावर काम करत होता. आरोपी महेश साळवे (वय अंदाजे ३० वर्षे) आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसमांनी चहा घेतला. नंतर अनिल यांनी आरोपीला  ४५ रुपये बिल मागितले. तेव्हा आरोपीने अनिल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींपैकी एकाने टपरीवरील कांदा कापण्यासाठी वापरल्या जाणारा लाकडी ठोकळा अनिलच्या डोक्यात घातला. यात अनिल जखमी झाला आहे. 

 या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटक नाहीत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories