ऑटो फीडर सेवेसाठी मेट्रोचा रॅपिडो कंपनीसोबत करार

ऑटो फीडर सेवेसाठी मेट्रोचा रॅपिडो कंपनीसोबत करार

ऑटो फीडर सेवेसाठी मेट्रोचा रॅपिडो कंपनीसोबत करार 

पुणे, ता.  ३० - पुणे मेट्रोने रॅपिडो कंपनीसोबत सोबत ऑटो फीडर सेवेसाठी नुकताच करार केला आहे. या फीडर सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना पुणे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होईल, अशी माहिती 'महामेट्रो' प्रशासनाने दिली आहे.

 या ऑटो फीडर सेवेची सुरुवात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने ही सेवा प्रत्येक मेट्रो स्थानकावर सुरु होणार आहे. या सेवेबाबत पुणे मेट्रो आणि  रॅपिडो यांच्यात नुकताच करार करण्यात आला. 

यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील आणि वरिष्ठ उप-महाव्यवस्थापक सुजित कानडे तसेच रॅपिडोचे अधिकारी-कर्मचारी आणि पुणे मेट्रोचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories