news
clock
छत्रपती शिवरायांवरील साडेपाचशे पुस्तकांचा संग्रह करणारे शिवभक्त संभाजी बारणे यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

छत्रपती शिवरायांवरील साडेपाचशे पुस्तकांचा संग्रह करणारे शिवभक्त संभाजी बारणे यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

 छत्रपती शिवरायांवरील साडेपाचशे पुस्तकांचा संग्रह करणारे शिवभक्त संभाजी बारणे यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद 

पिंपरी, ता. ३० - अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणूनच, असंख्य शिवभक्तांच्या घरी शिवरायांची प्रतिमा पाहायला मिळते, कित्येक शिवभक्त शिवरायांची प्रतिमा शरीरावर गोंदवून घेतात आपल्या कार्यालयात, वाहनामध्ये शिवरायांची मूर्ती ठेवतात. थेरगाव परिसराचील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या नऊ भाषांमधील ५५१ पुस्तकांचा संग्रह केलाय. बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. 

संभाजी बारणे यांच्या संग्रहातील पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील आहेत.  या पुस्तक संग्रहाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा पुस्तक संग्रह करणारे संभाजी बारणे हे एकमेव आहेत असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यामुळे शहारातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 संभाजी बारणे हे पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगावमध्ये स्थायिक असून शेती व बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध धातूंमधील विविध आकारांच्या ७० पेक्षा जास्त मूर्तीदेखील आहेत. केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेल्या दोन रुपयांच्या दीड हजार नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. ही पुस्तके आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, नाणी नागरिकांना पाहण्यासाठी त्यांच्या थेरगाव येथील कार्यालयात रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत.

 थेरगाव गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी बारणे यांनी पुढाकार घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही पुस्तके वाचण्यासाठी व संदर्भ साठी मोफत उपलब्ध करुन देत असल्याचेही संभाजी बारणे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण साहित्य अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारे बारणे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील १९७८ सालापासून २०२२ पर्यंतच्या आजी-माजी नगरसेवकांच्या १२०० व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला आहे. त्याची नोंदही सन २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद आहेत. त्यांनी संपादन केलेल्या 'पिंपरी चिंचवड वैभव' या कविता संग्रहाचे ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories