news
clock
५२ कोटी ६५ लाखांचा विक्रीकर थकवल्याने चिखलीतील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

५२ कोटी ६५ लाखांचा विक्रीकर थकवल्याने चिखलीतील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

५२ कोटी ६५ लाखांचा विक्रीकर थकवल्याने चिखलीतील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल 

पिंपरी, ता. ६ - वारंवार नोटिस बजावूनही विक्रीकराची रुपये ५२ कोटी ६५ लाख ८८ हजार ८९९/- थकबाकी न भरल्याने चिखली येथील व्यापाऱ्यावर मंगळवारी (ता. ५) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, वस्तू व सेवाकर विभागातील राज्यकर निरीक्षक सोमनाथ रणदिवे यांनी तक्रार दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यापारी चंद्रकात मोरे हे सन २०१४-१५, २०१५-२०१६ आणि सन २०१६-१७ या कालावधीच्या कर विवरणपत्राच्या पडताळणासाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी विक्रीकराची रुपये ५२ कोटी ६५ लाख ८८ हजार ८९९/- थकबाकी भरलेली नाही. याबाबत मोरे यांना वारंवार  वस्तू व सेवाकर विभागाकडून नोटिस बजावली आहे. पण, त्यांनी नोटिशीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चंद्रकांत मोरे व महिला आरोपी यांच्यावर मंगळवारी (ता. २) चिखली पोलिस ठाण्यात मुल्यवर्धीत कर कायदा २००२ च्या कलम ७४ (३) (H) व कलम ७४ (३) (t) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories