news
clock
सायबर फसवणुकीत अपहार झालेले ५६ लाख रुपये उद्योजकाला परत मिळवून दिले, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

सायबर फसवणुकीत अपहार झालेले ५६ लाख रुपये उद्योजकाला परत मिळवून दिले, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

सायबर फसवणुकीत अपहार झालेले ५६ लाख रुपये उद्योजकाला परत मिळवून दिले, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी 

पिंपरी, ता. ६ -  सायबर फसवणुकीत अपहार झालेली ५६ लाख रुपये रक्कम भोसरी येथील उद्योजकाला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. अपहार झालेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी सायबर पोलिसांनी परदेशातील बॅंकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. सायबर पोलिसांनी पार पाडलेली ही कामगिरी अभिमानास्पद आहे. 

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात संजय जाधव यांनी सायबर फसवणुकीची तक्रार केली होती. फिर्यादी जाधव यांची भोसरी येथील PHBB VALVES PVT LTD ही कंपनी हार्डवेअर क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे बाहेर देशातील Wenzhou Artech Machinery Technology co.LTD या कंपनी सोबत व्यवहार चालू असतात. जाधव यांच्या कंपनीची माहिती काढून अज्ञात इसमाने  कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने Wenzhou Artech Machinery Technology co.LTD या कंपनीशी साधर्म्य असलेला नवीन ईमेल आय. डी बनवला. त्यावरुन कंपनीचे बँक खाते डिटेल्स बदलून इतर बाहेर देशातील बँक अंकाउट नंबर देवून त्यावर हे नवीन बँक खाते असून यापुढे या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास जाधव यांना सांगितले. जाधव यांच्याकडून त्यावेळी ५६ लाख रुपये मागितले. जाधव  यांना सदरचा ईमेल खरा असल्याचे वाटल्याने त्यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी ५६,००,०००/- रुपये सिटीझन बँक यु.एस. ए. येथील बँक अकाउंटवर पाठविले. ही रक्कम  पाठविल्यानंतर जाधव यांनी Wenzhou Artech Machinery Technology co.LTD या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून पैसे आले का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमचे बॅक अंकाउट बदलेले नसून आम्ही सदर रक्कम मागणी केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यानां आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली व तत्काळ त्यांनी ऑनलाईन तक्रार केली व त्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

सायबर पोलिसांनी सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून रक्कम ज्या बँक खात्यावर गेली, त्या बँक खात्याची माहिती घेवून सदर गेलेली रक्कम ही फ्रिज करुन जाधव यांना परत करण्यासाठी बॅंकअधिकारी, नोडलअधिकारी यांच्याशी समन्मय ठेवून सदर रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अज्ञात इसमाने दिलेले बैंक खाते हे सिटीजन बँक अमेरिका येथील असल्याने पत्रव्यवहार करण्यात व समन्वय ठेवण्यात अडचणी येत होत्या. बॅंकेला सदर घटनेची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली व सदर रक्कम परत देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश मिळाले व  जाधव यांची गेली ५६ लाख रुपये रक्कम परत त्यांच्या बँक खात्यावर प्राप्त झाली आहे.

सदर कामगिरी   पिंपरी चिंचवडच पोलस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे - १ डॉ. विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक  वैभव पाटील व प्रकाश कातकाडे,  हवालदार रेणुका वाव्हळ,  दिपक भोसले व विनायक म्हसकर, पोलीस अंमलदार सोपान बोधवड, माधव आरोटे या  सायबर पोलीस ठाणाच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories