सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीची ७ लाख ४५ हजारांची फसवणूक
पिंपरी, ता. ४ - सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची ७ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना १५ जुलै २०२१ ते १६ जुले २०२५ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी रविवारी (ता. ३) रावेत पोलिस ठाण्यात महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, एका महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशी वसंतराव देशमुख (रा. बिजलीनगर, चिंचवड) ही या घटनेतील आरोपी आहे. खुशीने तृप्ती निलेश दैठनकर यांना सेल्स टॅक्स इंन्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी लावतो असे आमिष दाखवले. वेळोवेळी तृप्ती यांच्याकडून पैसे घेतले व कसलीही नोकरी न लावता त्यांची ७,४५,५००/-रुपायांची फसवणुक केली आहे. तृप्ती दैठणकर या फिर्यादी महिलेची व येरवडा येथील जेल विभागात ज्युनिअर क्लार्कची मैत्रिण आहेत.
या प्रकरणी आरोपी महिलेवर रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक झालेली नाही.