हातभट्टीची दारु बनवणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा
पिंपरी, ता. ४ - शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीची दारु बनवणाऱ्या महिलांविरोधात रविवारी (ता. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे शिरगाव गावचे हद्दीत पवना नदीच्या कडेला रविवारी (ता. ३) काही महिला हातभट्टीची दारर तयार करण्याकरीता लागणारे गुळमिश्रीत कच्चे रसायन भिजवत घालत असताना सापडल्या. या एकूण ८००० लिटर रसायनाची किंमत २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. याबाबत, पोलिस कॉन्स्टेबल
अतुल दिलीप चितारे यांनी फिर्याद दिली आहे. याशिवाय, मौजे पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला मोकळ्या जागेतही एक महिला हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे ८०० लीटर गूळ मिश्रीत कच्चे रसायन भिजत घालताना सापडली. पोलिसांची चाहूल लागताच ती पळून गेली. हा माल एकूण २८,८००/- रुपयांचा होता. पोलीस कॉन्स्टेबल -दिलीप विश्वनाथ राठोड यांनी फिर्याद दिली.
दोन्ही ठिकाणच्या आरोपी महिलांवर शिरगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (क) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.