news
clock
बारावीचा निकाल आज जाहीर, दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार

बारावीचा निकाल आज जाहीर, दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार

 बारावीचा निकाल आज जाहीर, दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार 

पिंपरी, ता. २ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, २ मे रोजी सकाळी 11 वाजता अधिकृतरित्या जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाइन पाहता येईल, असे बोर्डाने सांगितले आहे.

यंदा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावीची परीक्षा पार पडली. राज्यभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवरच निकाल तपासावा, तसेच इंटरनेट स्लो असल्यास संयम राखण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.


निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे - 

- hscresult.mahahsscboard.in

- hscresult.mkcl.org

- mahahsscboard.in

- डिजिलॉकरवरही निकालाची माहिती उपलब्ध होणार आहे.


- असा पाहायचा निकाल - 

- अधिकृत वेबसाइटपैकी कोणतीही एक साइट उघडा

'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा

- तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर प्रविष्ट करा

- आईचे पहिले नाव टाका

-'View Result' बटणावर क्लिक करा

- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट घेऊ शकता.

गुणपडताळणी - 

-   निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विद्यार्थी ३ ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories