राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार अबोली जरीत यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन्मान

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार अबोली जरीत यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन्मान

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार अबोली जरीत यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन्मान

पिंपरी, ता. १७ - ''प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकटे आणि आव्हाने येत असतात. मात्र, अशा परिस्थितीत खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे जात राहणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानायची नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्यास त्यातून नवे मार्ग आणि नव्या संधी निर्माण होतात. '' असे मत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार अबोली जरीत यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सोमवारी (ता. १५) झालेल्या सर्वसाधारण सभेत दिव्यांग कलाकार-गायिका अबोली जरीत यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गौरवण्यात आले.   महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते अबोली यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी अबोली यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी अबोली म्हणाल्या, ''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झालेल्या या सन्मानामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. या शहरात येण्याची आणि येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग भवनला भेट देण्याची संधी मिळाली. दिव्यांग भवन पाहून मी खरोखरच भारावून गेले. इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यात आलेले आणि दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले असे दिव्यांग भवन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. भारतातील पहिले दिव्यांग भवन पाहण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories