कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये मारहाण

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये मारहाण

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये मारहाण

पुणे, ता. १६ - पुणे विद्यापीठात झालेल्या आंदोलनानंतर जयपूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) आंदोलन सुरू होते.‌  आंदोलनात सीजेपी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांना एका तरुणाने कानाखाली मारली. आंदोलनासाठी आलेल्या तरुणांनी मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाला लगेचच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके म्हणाले की, "शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहे. आम्ही शांततेने आपला आवाज उठवत राहू,  आम्ही महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असून शांतता आणि प्रेमाने  लढा सुरू ठेवणार आहोत."

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, असे अभिजीत यांनी पुन्हा एकदा सांगितले.आंदोलनापूर्वी अभिजीत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "जर भारताच्या सरन्यायाधीशांनी 'कॉकरोच' हा शब्द वापरला नसता, तर हे आंदोलन सुरू झाले नसते." असे सांगून त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories