जनगणनेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, ता. ३० - जनगणना २०२७ ची प्रक्रिया सुरु झाली असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या माध्यमातून मिळणारी माहिती विविध शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी उपयोगी ठरते. म्हणूनच जनगणनेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
आयुक्तांनी सांगितले आहे की, १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. त्याचबरोबर, १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. सर्व नागरिकांनी योग्य व अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. ही जनगणना मोहीम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सहकार्य करावे.
जनगणनेमध्ये विचारले जाणारे प्रश्न पुढीलप्रमाणे -
१) घराचा नंबर काय आहे?, २) प्रमुखाचा मोबाईल नंबर, ३) कुटुंब क्रमांक, ४) कुटुंबप्रमुखाचे लिंग काय आहे?, ५) जात, सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग- तुम्ही कोणत्या जातीचे आहात ?, ६) कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे ?, ७) कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?, ८) विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे ?, ९) घराच्या मालकीची स्थिती काय आहे ?, १०) घरात किती खोल्या आहेत?, ११) शौचालय उपलब्ध आहे की नाही?, १२) शौचालयाचा प्रकार कोणता आहे ?, १३) सांडपाण्याचा निचरा होतो की नाही?, १४) पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे?, १५) पिण्याचे पाणी उपलब्ध आहे की नाही?, १६) विजेचा स्रोत काय आहे?, १७) बाथरूम उपलब्ध आहे की नाही?, १८) घरी गॅस कनेक्शन आहे का?, १९) घरी टीव्ही आहे का ?, २०) इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे की नाही?, २१) रेडिओ आहे की ट्रान्झिस्टर ?, २२)स्वयंपाकासाठीचे मुख्य इंधन कोणते आहे?, २३) तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का?, २४) टेलिफोन, मोबाईल किंवा स्मार्ट फोन म्हणजे काय ?, २५) तुमच्याकडे सायकल, स्कूटर, मोटरसायकल आहे की नाही?, २६) तुमच्याकडे काय आहे : कार, जीप की व्हॅन ?, २७) मुख्य धान्य कोणते आहे? २८) इमारत क्रमांक काय ?, २९) घराचा वापर, ३०) घराची स्थिती, ३१) फरशीसाठी प्रामुख्याने सिमेंट, ग्रॅनाइट किंवा मार्बल हे साहित्य वापरले जाते, ३२) घराच्या भिंतींमध्ये कोणत्या सामग्रीचा वापर केला जातो? ३३) घराच्या छतासाठी वापरली जाणारी सामग्री.