सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
पिंपरी, ता. ११ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर अनैतिक मानवी वाहतक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (ता. १०) ही महिला आळंदी इंद्रायणी नदीवर नवीन झालेल्या पुलावर लाईट नंबर १ जवळ सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव आणि शब्द उच्चारत होती. तिच्या या कृत्यामुळे पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत होता आणि सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाला.
याबाबत फौजदार सुनिल जगन्नाथ शिरसाट (नेमणूक: अनैतिक मानवी वाहक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अटक नाही. आरोपी महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.