आंबेठाण परिसरात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

आंबेठाण परिसरात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

आंबेठाण परिसरात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

पिंपरी, ता. ११ : आंबेठाण गावच्या हद्दीत कोरेगाव फाटा येथील अधिरा चायनिज सेंटरच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दोन आरोपी देशी आणि विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री करत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी पोलिसांनी १० जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकून दारु जप्त केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बबन पडवळ (वय ३२, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) आणि कृष्णा नामदेव खोडवे (वय ३०, रा. कोरेगाव फाटा, आंबेठाण; मूळ पत्ता मोहगाव, ता. अहमदपूर, जि. लातुर) हिच्याकडे देशी आणि विदेशी दारू जप्त केली. एकूण ११,३१० रुपये किंमतीची दारू पोलिसांनी बेकायदेशीर ताब्यात घेतली.

याबाबत फिर्याद साहिल प्रदीप सांडभोर यांनी दिली असून गुन्हा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories