आंबेठाण येथे तरुणावर कटरने केले वार, मूळचा उत्तर प्रदेशातील आरोपी अटक

आंबेठाण येथे तरुणावर कटरने केले वार, मूळचा उत्तर प्रदेशातील आरोपी अटक

आंबेठाण येथे युवकावर कटरने केले वार, मूळचा उत्तर प्रदेशातील आरोपी अटक  

पिंपरी, ता. १२ - खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात जुन्या वादातून एका मजुरावर कटरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १० जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ केदार यादव (वय ३८) हे आंबेठाण येथे वास्तव्यास असून मजुरीचे काम करतात. १० जून रोजी ते आपल्या भावाच्या घरी जेवणासाठी गेले असताना संतोष रामकिशन यादव (वय २७) याने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून रूमबाहेर भेटण्यासाठी बोलावले.

जगन्नाथ यादव हे घराबाहेर आल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ करून वाद घातला. त्यानंतर त्यांचा हात पकडून जोराने फिरवत मारहाण केली.   खिशातून कटर काढून जगन्नाथ यादव यांच्या डाव्या खांद्यावर, पाठीवर तसेच पोटाच्या डाव्या बाजूस वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी संतोष यादव याला अटक केली आहे .


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories