भाडेतत्वावर घेतलेला ट्रक व भाडे परत न करता तिघांची फसवणूक

भाडेतत्वावर घेतलेला ट्रक व भाडे परत न करता तिघांची फसवणूक

 भाडेतत्वावर घेतलेला ट्रक व भाडे परत न करता तिघांची फसवणूक   

पिंपरी, ता. १२ - भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रकचे ठरल्याप्रमाणे भाडे न देता ३२ वर्षीय तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी ४० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणुकीचा हा प्रकार विठ्ठलवाडी-देहूगाव येथे घडला आहे.   

याबाबत, किरण रामदास तावरे (वय ३२ वर्षे, नोकरी, रा. विठ्ठलवाडी-देहूगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर मारुती पडदुने (वय अंदाजे ४० वर्षे)  याने फिर्यादी किरण यांचा आयशर टेम्पो भाडेतत्वार घेतला होता. या व्यवहारात त्याने किरण यांचा विश्वास संपादन केला. मात्र, टेम्पोचे डिसेंबर २०२५ पासूनचे भाडे तसेच ट्रक किरण यांना  परत न देता आरोपीने त्यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादीप्रमाणे साक्षीदार मारुती चाटे यांचा आयशर  टेम्पो व साक्षीदार नारायण दिक्षीत यांचा अशोक लेलंड ट्रक भाड्याने घेवून त्यांचे ठरल्याप्रमाणे भाडे न देता तसेच वाहने परत न करता त्यांचीही आरोपीने फसवणूक केली आहे. 

आरोपीवर देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories