निगडीत देशी दारूचा साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

निगडीत देशी दारूचा साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

निगडीत देशी दारूचा साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. ११ - ओटास्कीम-निगडी स्पाईन रोडलगत काळभोर गोठा परिसरात बेकायदेशीररीत्या देशी दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर गोठा सार्वजनिक नाल्याजवळ, स्पाईन रोडलगत ओटा स्कीम परिसरात लक्ष्मी राजेश पवार (वय ३७, रा. काळभोर गोठा, निगडी) हिच्याकडे देशी दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेल्या ‘पॉवर लाईम पंच’ या देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या १५ प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी फिर्याद दिली असून लक्ष्मी पवार हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला बीएनएसएस कलम १२६ अन्वये नोटीस देण्यात आली आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories