निगडी-रावेत बस स्थानकाची दुरवस्था, तुटून लोंबकळणाऱ्या खांबामुळे अपघाताची शक्यता
Apr 25 2026
42
निगडी-रावेत बस स्थानकाची दुरवस्था, तुटून लोंबकळणाऱ्या खांबामुळे अपघाताची शक्यता
पिंपरी, ता. २५ - निगडी-रावेत बीआरटी बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. स्थानकाच्या जोडणील लोखंडी खांब निखळले जात आहेत. एक खांब लोंबकळत आहे. त्यामुळे या ठिकाणी हा खांब डोक्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. ही महत्वाची बाब भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी निदर्शनास आणून दिली आहे आणि पीएमपी प्रशासन व महापालिकेने या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
काळभोर यांनी याबाबत, पीएमपीएमएल बस ट्रान्सपोर्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेल द्वारे तक्रार केली आहे. तसेच महापालिका आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. बीरआरटी बस स्थानकांचे बांधकाम दर्जेदार नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी. त्याआधी लोंबकळणारा खांब पडून अपघात होण्याआधी येथे दुरुस्ती करावी, असे काळभोर यांनी सांगितले आहे.
- Bharatiya Janata Party, Sachin Kalbhor, PMP, Municipal Corporation, complaint, repair
- breaking, hanging pole, accident,
- Nigdi-Ravet, BRT, bus station, deterioration, iron poles
- पीएमपी, महापालिका, तक्रार, दुरुस्ती, ठेकेदार, दंडात्मक कारवाई, बांधकाम
- भारतीय जनता पक्ष, सचिन काळभोर,
- निगडी-रावेत, बीआरटी, बस स्थानक, दुरवस्था, लोखंडी खांब