शिक्रापूर रोडवर भीषण अपघात ; टेम्पो-ट्रकच्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू

शिक्रापूर रोडवर भीषण अपघात ; टेम्पो-ट्रकच्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू

खेड तालुक्यातील बहुळगाव हद्दीत शिक्रापूर रोडवर एक टेम्पो आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली आहे. या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालवणाऱ्या चालकाविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास बहुळगाव हद्दीतील शिक्रापूर रोडवर हा अपघात घडला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय रसाळ (वय 27 रा. वडगाव घेणंद) असे तक्रारदाराचे नाव आहे. रसाळ याने संदीप नितनवरे (वय ४२, रा. वडगाव घेणंद) विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

रसाळ याच्या तक्रारीनुसार, आरोपी संदीप नितनवरे हा टेम्पो भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी त्याने समोरून येणाऱ्या अजय रसाळ याच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघतात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, या अपघातात टेम्पोमधील सागर सुरेश नितनवरे (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोहिते पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories