चऱ्होलीत धक्कादायक प्रकार ; शिवीगाळ करत व्यक्तीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

चऱ्होलीत धक्कादायक प्रकार ; शिवीगाळ करत व्यक्तीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (4 नोव्हेंबर 2026) सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खुर्द येथील कृष्णा आयकॉन सोसायटीत राहणाऱ्या संतोष घानखेडे (वय 42) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संतोष घानखेडे हे कामासाठी बाहेर जात असताना त्यांच्या सोसायटीतील विवेक बसनगार यांनी (वय अंदाजे ४५) त्यांना अडवले. यानंतर त्यांनी 'तू मला शिव्या का देतो आहेस?' असा जाब विचारण्याच्या बहाण्याने घानखेडे यांचा रस्ता अडवून त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय, तक्रारदार घानखेडे यांना मारहाण करण्यात आले असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घानखेडे यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना हाताने चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच पोट आणि पाठीवर लाथा मारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. एवढेच नाही तर त्यांना तुझा मर्डर करून टाकील अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही विवेक बसनगारवर करण्यात आला आहे.

या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), १२६(२), २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories