पिंपरी-चिंचवडच्या पाच खेळाडूंची राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवडच्या पाच खेळाडूंची राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

पिंपरी-चिंचवडच्या पाच खेळाडूंची राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवडमधील बळवंत सुर्वे बॉक्सिंग क्लबच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र बॉक्सिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुण्यातील ताडीवाला रोड येथील मेट्रो मैदानावर नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत या खेळाडूंनी विविध वजनी गटात सुवर्णपदके पटकावली.

मुला-मुलींच्या कॅडेट तसेच सर्व ज्युनिअर गटातील १० ते १५ वयोगटातील खेळाडूंसाठी ही निवड चाचणी घेतली होती. यात सुर्वे बॉक्सिंग क्लबच्या पाच मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्णपदके पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले.

ही राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील पालधी येथे होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रुद्र खबाले कॅडेट (३६ ते ३८ किलो), आदित्य शेटे (४५ ते ४८ किलो), कनिष्ठ वेदांत सुवर्ण (४३ ते ४५ किलो), विनायक मोरे (५८ ते ६१ किलो) आणि आदित्य मुव्वला (६१ ते ६४ किलो) यांचा समावेश आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories