पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठक 

पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर. (CSR) कक्ष अंतर्गत शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूह यांच्याद्वारे प्राप्त होणारा सी. एस. आर. निधी मिळविणे तसेच त्याचा योग्य वापर करून शहराच्या शाश्वत विकासात हातभार लावणे या उद्देशाने मोरवाडी येथील दिव्यांग भावन फाऊंडेशन येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सह आयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक वारे गुरूजी, सीएसआर कक्षाचे विजय वावरे, श्रुतिका मुंगी उपस्थित होते.

यांच्यासह अल्फा लावल, एल्केजेन, एरॅमॉन्ड, ऍटलास कॉप्को, ऍटकॉम लिमिटेड, बजाज फायनान्स, बिसलेरी, बीएमसी सॉफ्टवेअर, ब्रिजस्टोन, सीआयई इंडिया, डीएएनए लिमिटेड, डेलोरोटो इंडिया, डायम डिस्प्ले, डी-मार्ट, फिआट, कावासाकी मोटर्स, पदमजी, सॅडविक कोरोमंट, एसकेएफ इंडिया, टाटा मोटर्स, थरमॅक्स, टीकेआयएल, डब्ल्यूटीई इन्फ्रा, यझाकी, ऍडियंट लिमिटेड, बजाज ऑटो, बॉश, गरवारे, हुडको या कंपन्यांचे सीएसआर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories