भोसरीत गांजा बाळगणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १३ - अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान भोसरी पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गांजा बाळगल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता मच्छी मार्केट, पीएमटी चौक, भोसरी येथे कारवाई करण्यात आली. यावेळी रसिका गोविंद जगताप (वय २१, रा. खांदवेनगर ४, विमाननगर, पुणे) हिच्या ताब्यात ६ हजार ५०० रुपये किमतीचा १३० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच आरोपीकडे असलेली एमएच १४ जेवाय ६२१५ क्रमांकाची अॅक्टिव्हा दुचाकी, किंमत ३० हजार रुपये, जप्त करण्यात आली.
सदर गांजा विक्रीच्या उद्देशाने अनधिकृत व बेकायदेशीररित्या ताब्यात बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार प्रतिभा गौरव मुळे (ब. नं. १०८१) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी तरुणीस नोटीस बजावण्यात आली असून तिच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) तसेच २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे