चिमुकलीच्या न्यायासाठी सांगवी परिसरातील नागरीकांचा 'कॅन्डल मार्च'

चिमुकलीच्या न्यायासाठी सांगवी परिसरातील नागरीकांचा 'कॅन्डल मार्च'

चिमुकलीच्या न्यायासाठी सांगवी परिसरातील नागरीकांचा 'कॅन्डल मार्च'

पिंपरी, ता. ७ - नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सांगवी परिसरातील सामाजिक संघटनांनी 'कॅन्डल मार्च' काढला. चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेतील आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करत घोषणा दिल्या.'चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे', 'अमानुष कृत्याचा तीव्र निषेध असो' या घोषणा परिसरात घुमल्या. 

या कॅंडल मार्चची सुरुवात शितोळे नगर चौकातून झाली. अहिल्यादेवी होळकर पुतळा येथे नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली. आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ''ही लढाई केवळ एका चिमुकलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याची आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात भीती निर्माण होणार नाही.'', अशी ठाम भूमिका सर्वांनी व्यक्त केली.  

या आंदोलनात सांगवी परिसरातील नागरीक, सत्तारुढ पक्षाचे गटनेते प्रशांत शितोळे, रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड, गणेश ढोरे, रविंद्र निंबाळकर, कमलाकर जाधव, मेघराज लोखंडे, अवधूत कदम, राहुल ससाणे, भरत खरात, प्रसाद शिंदे, कलावती सोनवळकर, शुभदा मोरे, साई कोंढरे, राहुल नितीनवरे, संजय तरटे यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories