चाकण परिसरात गांजा जप्त, एकाला अटक

चाकण परिसरात गांजा जप्त, एकाला अटक

चाकण परिसरात गांजा जप्त, एकाला अटक 

पिंपरी,‌ ता. चाकण परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा या अंमली पदार्थासह एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे ३५८ ग्रॅम गांजा व मोटारसायकल असा एकूण १८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता चाकण गाव हद्दीतील पुणे–नाशिक रोडपासून घाडगे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, भरत एकनाथ कानपिळ यांच्या लक्ष्मीपुत्र बंगल्याच्या भिंतीजवळ करण्यात आली. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळू मराडे (पोलिस अंमलदार, बक्कल नं. २७३०, नेमणूक चाकण उत्तर पोलीस ठाणे) यांनी ही कारवाई नोंदवली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अली साजिद सिकिलकर (वय २०, रा. माळी चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे असून, संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा (वय २६, सध्या रा. रजत हॉस्पिटलचे बांधकामस्थळ, घाडगे मळा, चाकण; मूळ रा. जमखोरी, ता. सुराव, जि. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) हा दुसरा आरोपी आहे.

दरम्यान, या प्रकरणात निखिल ऊर्फ दाद्या कांबळे, सलमान इनामदार, संकेत कौटकर आणि प्रविण जाधव ऊर्फ बॉस या आरोपींचा शोध सुरु आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories