घरभाड्याच्या वादातून भाडेकरुला घरमालकाकडून जबर मारहाण

घरभाड्याच्या वादातून भाडेकरुला घरमालकाकडून जबर मारहाण

घरभाड्याच्या वादातून भाडेकरुला घरमालकाकडून जबर मारहाण 

पिंपरी, ता. २० - घरभाड्याच्या वादातून भाडेकरुला जबर मारहाण करुन जखमी केल्याची घटना थेरगाव येथील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये गुरुवारी (ता. १८) रात्री १० च्या सुमारास घडली आहे. आरोपींविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, भाडेकरु विकास मधुकर पंडीत (वय २६ वर्षे, धंदानोकरी, रा. बबनकाटे यांचे रुममध्ये, सुंदरकॉलनी, थेरगांव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी बबन काटे (वय अंदाजे ४५ वर्षे), बबन काटे यांचा मुलगा व दोन अनोळखी इसमांवर काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 घरमालक काटे यांनी  भाडेकरु फिर्यादी विकास यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली.  काटे यांच्यासोबत असलेल्या मुलाने विकास यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विकास यांची पत्नी त्यांना सोडवायला मध्ये आली असता त्यांनी चौघांनी पत्नीला सुध्दा हाताने मारहाण केली.  बबन काटेंच्या मुलाने त्याच्या हातातील लोखंडी कोयता उलटया बाजूने विकास यांच्या डोक्यामध्ये मारुन त्यांना जखमी केले.  एका अनोळखी इसमाने त्याच्या हातातील लाकडी दांडके विकास यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ मारुन त्यांना जखमी केले. 

या प्रकरणी आरोपींविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३७ (१)(३), १३५ तसेच ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories