चाकणमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त, पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाकणमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त, पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाकणमध्ये प्रतिबंधित गुटखा जप्त, पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १० - चाकण पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करुन एका पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ८ जून)  रात्री ११ च्या सुमारास महात्मा फुले चौक ते आंबेठाण चौकादरम्यान, समाधान खानावळीजवळ आली. या प्रकरणी नवनाथ ज्ञानोबा गोरे (वय ५१, रा. आंबेठाण रोड, चाकण) याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस नाईक भैरोबा मनोहर यादव (बकल नंबर ११२२) यांनी याchबाबत फिर्याद दिली. आरोपीचे नाव नवनाथ ज्ञानोबा गोरे (वय ५१ वर्षे, व्यवसाय - पानशॉप रा. समाधान खानावळच्या बाजूस, आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड) असे आहे. आरोपीकडे विक्रीच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विमल पान मसाला, सम्राट पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखू असा एकूण ३९ हजार ७०२ रुपयांचा साठा आढळून आला. या पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग व इतर गंभीर आजार होऊ शकतात, याची माहिती असतानाही आरोपीने हा साठा बाळगला होता.  पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला गुटखा राम गुप्ता यांनी पुरविल्याची माहिती मिळाली आहे. 

आरोपीवर उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७४,२७५,२२३,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories