तळेगाव दाभाडे येथे महिलेला मारहाण, पतीविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १० - तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. ८) घडली आहे. पतीविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खळदे मळा येथील मंत्रा सिटी सोसायटीतील हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यांचे पती पती सागर पंढरीनाथ राजगुरू घरी आला असता आधार कार्ड संदर्भात दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन अपमानास्पद वक्तव्य केले. ''माझे नाव कोठे ही लावायचे नाही.'', असे पती म्हणाला. त्यावर पत्नीने त्यांना 'माझ्याशी लग्न का का केले' असे विचारताच पतीने मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून आलेल्या ट्रायसायकलने पत्नीला मारले. या मारहाणीत पत्नी जखमी झाली आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.