मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, सात मोटारसायकल जप्त

मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, सात मोटारसायकल जप्त

मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, सात मोटारसायकल जप्त 

पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - चाकण परिसरात मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेल्या सात मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कामगिरी चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलिस स्टेशन हद्दितून वारंवार मोटार सायकल चोरी होत असल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते. त्यांचा तपास करताना चाकण उत्तर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने  गोपनीय माहिती काढून व 'सी.सी.टी.व्ही.'ची पाहणी केली. त्यानुसार, सराईत आरोपी अशोक सोनवणे (रा. ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक केली. आरोपीकडून चोरलेल्या ७ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त  सारंग आव्हाड, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उप आयुक्त परीमंडळ - ३ मारुती जगताप, सहाय्यक पोलिस आयुक्त चाकण विभाग योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चाकण उत्तर पोलिस स्टेशन जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलिस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोलिस शिपाई महेश कोळी, शिवाजी लोखंडे, अक्षय सांडभोर यांनी केली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories