जप्त केलेल्या फ्लॅटचे कुलूप आणि सील तोडल्याप्रकरणी गुन्हा

जप्त केलेल्या फ्लॅटचे कुलूप आणि सील तोडल्याप्रकरणी गुन्हा

चाकण | २८ ऑक्टोबर २०२६ : फायनान्स कंपनीकडे तारण ठेवलेल्या फ्लॅटचे कुलूप आणि सील तोडून त्यामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा प्रकार चाकण परिसरात समोर आला आहे. संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्याला दुसरे कुलूप लावल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीविरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास चाकण येथील साई साम्राज्य सोसायटी, आंबेठाण रोड, डी विंग, फ्लॅट क्रमांक १४, दुसरा मजला येथे उघडकीस आली.

या प्रकरणी अक्षय भिमराव औटी  (वय ३० वर्षे, व्यवसाय लीगल अंडररायटर, मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड, हडपसर, रा. ए विंग, फ्लॅट क्रमांक २०१, प्रजाराज लोटस सोसायटी, चंदननगर, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रशांत जगदीश भामरे (वय ४० वर्षे, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी हे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनीकडे तारण असलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी संबंधित ठिकाणी गेले होते. त्यावेळी तारण मालमत्ता सुस्थितीत असल्याचे दिसून आले.

मात्र, फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेले रिकव्हरी मॅनेजर अजित गायकवाड व रिकव्हरी ऑफिसर रोहित गवळी यांना फ्लॅटधारक तसेच साई साम्राज्य सोसायटीच्या वॉचमनकडे चौकशी केल्यानंतर संबंधित फ्लॅटबाबत माहिती मिळाली.

तक्रारीनुसार, आरोपीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी लावलेले कुलूप आणि सील तोडून संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फ्लॅटच्या दरवाजाला दुसरे कुलूप लावले. तसेच कंपनीने तारण मालमत्तेला लावलेले कुलूप आणि सील तोडून नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१६/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories