भोसरीत कामगाराचा मृत्यू; सुरक्षा साधनांअभावी निष्काळजीपणाचा आरोप

भोसरीत कामगाराचा मृत्यू; सुरक्षा साधनांअभावी निष्काळजीपणाचा आरोप

भोसरी | २६ ऑक्टोबर २०२६ : भोसरीतील चक्रपाणी वसाहत परिसरात पेट्रोल पंपाजवळील शेडमध्ये काम करताना पाय घसरून खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षेची साधने न पुरवल्याचा आरोप करण्यात आला असून, भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा कश्यप (वय १९ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारील शेडमध्ये वीस फूट उंचीवरील फॅब्रिकेशनचे काम करत होता.

ही घटना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारी, मोकळ्या जागेतील शेडमध्ये, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.

काम सुरू असताना शिवा याचा पाय घसरला आणि तो खाली जमिनीवर पडला. या अपघातात त्याच्या कानातून रक्त येऊ लागले. त्याला उपचारासाठी  साईनाथ हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदाराने कामगाराला आवश्यक सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, रस्सी आणि इतर सुरक्षा साहित्य पुरवले नव्हते. सुरक्षेच्या साधनांचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे शिवा कश्यप याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories